सातारा : सातारा शहरामधून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण, तर एक युवती बेपत्ता झाल्याच्या फिर्यादी सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. पहिल्या घटनेत अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले आहे, तर दुसर्या घटनेत एक युवती बेपत्ता झाली आहे. या दोन्ही घटना दि. ७ जानेवारी रोजी घडल्या आहेत. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.