सातारा : हिंदू धर्मियांच्या आराध्य दैवताबाबत वादग्रस्त आक्षेपार्ह आणि अपमानजनक वक्तव्य होत असताना मंचावर उपस्थित असताना खासदार शरद पवार यांनी मौन बाळगले, हिंदूंचा होणारा अपमान बघत बसले. म्हणजेच हिंदू दैवतांच्या होणार्या अपमानाला त्यांनी मूक संमती दिली. याचा निषेध म्हणून आज पोवई नाका येथे सकल हिंदू समाजातर्फे निषेध आंदोलन करण्यात आले.
ज्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव यानी हे वादग्रस्त आणि हिंदू धर्मियांच्या देवतांच्या बाबतीत अपमानजनक वक्तव्य केले, त्या कार्यक्रमाला उपस्थित असूनही मुद्दाम मूग गिळून गप्प बसणार्या शरद पवार आणि कोल्हापूरचे शाहू महाराज यांचा हिंदूद्वेष्टा म्हणून निषेध करण्यात आला.
आजपर्यंतचा इतिहास पाहता खासदार शरद पवार हे नेहमीच हिंदूंच्या दैवतांचा आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील लाखो हिंदू बंधू भगिनींचे श्रद्धास्थान असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचाही वारंवार अपमान करत असतात. शरद पवारांनी हिंदू द्वेष कमी करावा अन्यथा त्यांना सातार्यात फिरू देणार नाही, असा इशारा विक्रम पावसकर आणि उपस्थितांनी दिला.
यावेळी भारतीय जनता पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आणि हिंदू एकता आंदोलनाचे विक्रम पावसकर, शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान चे बापू ओतारी, अभिजीत बारटक्के, अजय बर्गे, विजय पवार, महेश पवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुकुंद आफळे, महेश शिवदे, श्रीधर कुलकर्णी, अशोक रेमजे, प्रकाश शहाणे,विश्व हिंदू परिषद चे विजय गाढवे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राहुल पवार, बजरंग दलाचे विक्रांत विभुते, दुर्गा वाहिनी शक्ती साधना च्या वैष्णवी ताटे, सुनिषा शहा, श्रध्दा माने, देवयानी माने, श्रुतिका जाधव, रीना भणगे, कुंजा खंदारे, गौरी गुरव, अश्विनी हुबळीकर, पायल जाधव, विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, किशोर पंडित, धनंजय जांभळे, सचिन साळुंखे, चिन्मय कुलकर्णी, राहुल शिवनामे, प्रवीण शहाणे, शैलेंद्र कांबळे, रवी आपटे, राज सोनवले, सुनील लाड, सचिन पाटील, गणेश पवार, भरत रावळ, संदीप जोंधळे, यशोवर्धन मुतालिक, अनिकेत निकम, विक्रम बोराटे, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानचे कार्यकर्ते, स्वयंसेवक उपस्थित होते.
सकल हिंदू समाजाचे आंदोलन
शरद पवार यांचा हिंदूद्वेष्टा म्हणून केला निषेध; सातार्यात पाय ठेवू न देण्याचा सकल हिंदू समाजाचा इशारा
by Team Satara Today | published on : 12 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा