सातारा : जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य शासनाकडील आदेशाने जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या कार्यक्रमाचा तपशिल पुढील प्रमाणे आहे.
निवडणूक विभाग गणनिहाय प्रारुप मतदार यादी प्रसिध्द करणे दि.८ ऑक्टोबर रोजी, प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि.१४ ऑक्टोबर रोजी, निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करुन प्रसिध्द करणे दि.२७ ऑक्टोबर रोजी, मतदान केंद्राची व मतदान केंद्रनिहाय यादी प्रसिध्द करणे दि.२७ ऑक्टोबर रोजी, निवडणूक विभाग व निर्वाचक गणनिहाय प्रारुप मतदार यादी सातारा जिल्हयातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये व त्या तालुक्याच्या कार्यक्षत्रातील पंचायत समिती मधील ज्या त्या गट व गणनिहाय यादी दि.8 ऑक्टोबर रोजी प्रसिध्द करणेत येणार आहे.
8 ऑक्टोबर रोजीपासून गट व गणनिहाय प्रारूप मतदार याद्या कार्यालयीन वेळेत तहसिलदार कार्यालयामध्ये सर्व सर्वसामान्यांना पहावयास उपलब्ध केलेल्या आहेत. सदर प्रारुप मतदार यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी दि.८ ते दि.१४ ऑक्टोबर रोजीपर्यंत असून कार्यालयीन वेळेत सर्व तहसिलदार कार्यालयात हरकती स्वीकारण्यात येतील, असे विक्रांत चव्हाण उपजिल्हाधिकारी (महसूल) यांनी कळवले आहे.