सातारा : ढोल ताशांचा गजर आणि हलगीचा कडकडाट छत्रपती शिवरायांच्या नावाचा जयघोष अशा जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये अजिंक्यतारा किल्ल्यावरील सदरेवर गड पूजन करण्यात आले. अजिंक्यतारा किल्ल्याचा कोपरा न कोपरा मशाल महोत्सवांनी उजळून निघाला. शिवकाळाच्या मस्मृती मशाल महोत्सवाच्या निमित्ताने जागवण्यात आल्या. सातारा शहरातून उजळलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचे मनोहर दृश्य दिसून येत होते.
सातारा नगरपालिका व शिवराज्याभिषेक दिन संयोजन समिती यांच्यावतीने शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .सातारा शहरातील स्वागत कमानी तसेच ठीक ठिकाणी ऐतिहासिक शिवकाळ जिवंत करणारी छायाचित्रे यामुळे राजधानी साताऱ्याला साक्षात शिवनगरीचा भास होत आहे .शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला संयोजन समितीच्या वतीने मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजता अजिंक्यतारा किल्ल्यावरील ऐतिहासिक राज्य सदरेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते गड पूजन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अमोल मोहितेउपनगराध्यक्ष एड. दत्ता बनकर बांधकासभापती बाळू खंदारे, गटनेते अविनाश कदम, पक्ष प्रतोद निशांत पाटील, नियोजन सभापती अशोक शेडगे मागासवर्गीय विशेष कल्याण समिती सभापती संकेत साठे, आरोग्य समिती सभापती धनंजय जांभळे, महिला व बालकल्याण सभापती मोनिका घोरपडे तसेच शेकडो मावळे यावेळी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते राज्यसभेची पूजा झाल्यानंतर पहिली मशाल उजळवण्यात आली. तसेच अजिंक्यतारा किल्ल्यावर आणि बुरुजांवर ठिकठिकाणी या मशाली पेटवून स्थापित करण्यात आल्या. त्यामुळे मशालींच्या उजेडामध्ये अजिंक्यतारा उजळून निघाला. सातारा शहरातून सुद्धा हे दृश्य पाहता येत होते. ढोल ताशांचा गजर हलगीचा कडकडाट आणि फेटे घातलेले उत्साहाने वावरणारे मावळे ठिकठिकाणी छत्रपती शिवरायांच्या आघात कर्तुत्वाची माहिती देणारे छोटे छोटे कार्यक्रम यामुळे अजिंक्यतारा किल्ल्याच्या कणाकणाने शिवकाल अनुभवला. मावळ्यांनी शिव वंदना म्हणून संपूर्ण गडाला मशाल घेऊन एक फेरी मारली. शिवजयंतीच्या मुख्य दिवशी शिवतीर्थावर अभिषेक वेगवेगळ्या ज्योतींचे स्वागत छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये विविध व्याख्यान पर कार्यक्रम व छत्रपती शिवरायांच्या 25 फुटी पुतळा प्रकल्पाचे भूमिपूजन इत्यादी कार्यक्रम होणार आहेत.
मुख्य शिवजयंतीसाठी सातारा सज्ज
दिनांक 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या निमित्ताने संपूर्ण सातारा हा शिवमय होऊन गेला आहे .सातारा शहरा ठीक ठिकाणी मंच उभारण्यात आले असून तेथे शिवरायांच्या प्रतिकृती स्थापित करण्यात आल्या असून संपूर्ण सातारा शहराला ऐतिहासिक कमानी तसेच रंगीबेरंगी ध्वज भगवे झेंडे यांनी सजवण्यात आले आहे. शिवतीर्थावर सायंकाळी महाआरती फटाक्यांची आतषबाजी आणि त्यापूर्वी गांधी मैदान ते राजवाडा अशी भव्य शिव मिरवणूक काढण्यात येणार आहे. या मिरवणुकीमध्ये हत्ती घोडे पारंपारिक देशातील मावळे तसेच ढोल ताशे हलगी ही पारंपारिक वाद्य वाजवली जाणारा असून अघोरी नृत्य हे आकर्षणाचा विषय असणार आहे. अघोरी नृत्यावर काही संघटनांनी आक्षेप घेतला तरी शिवजयंतीच्या संदर्भाने मनोरंजनात्मक प्रकार म्हणून नगराध्यक्षांनी या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे अघोरी नृत्य होणार असे त्यांनी सांगितले. वेगवेगळ्या शिवज्योतींचे आगमन अजिंक्यतारा किल्ल्यावर मंगळाई देवीचे दर्शन त्यानंतर शिवभक्तांना अल्पोप आहाराचे वाटप असे विविध संघटनांच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय छत्रपती शिवाजी संग्रहालयातपत्रातून उलगडलेले छत्रपती शिवराय या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले असून शिवाजी संग्रहालय शिवभक्तांना दिवसभर खुले राहणार असल्याचे कळविण्यात आले आहे.