सातारा शहर परिसरात चार जुगार अड्ड्यावर पोलिसांचे छापे

by Team Satara Today | published on : 10 October 2025


सातारा  : सातारा शहर परिसरात पोलिसांनी चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. मोळाचा ओढा येथे जुगार प्रकरणी सुरज आकाराम यादव (वय ५८, रा. व्‍यंकटपुरा पेठ, सातारा) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून ८१० रुपये व जुगाराचे साहित्‍य जप्‍त केले आहे.

दुसरी कारवाई सुशांत संदीप ढवळे (वय ३५, रा.शनिवार पेठ, सातारा) याच्यावर करण्यात आली आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून ८१० रुपये व जुगाराचे साहित्‍य जप्‍त केले आहे. पोलिसांनी ही कारवाई गोडोली येथे केली आहे.

तिसरी कारवाई सचिन भानूदास अवघडे (वय ३९, रा. सासपडे ता.सातारा) याच्यावर गोडोली परिसरात करण्यात आली आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून ११३० रुपये व जुगाराचे साहित्‍य जप्‍त केले आहे.

पोलिसांनी चौथी कारवाई सागर पांडूरंग भिलारे (वय ३४, रा.देगाव ता.सातारा) याच्यावर बॉम्‍बे रेस्‍टॉरंट परिसरात केली आहे. पोलिसांनी त्‍याच्याकडून १८४० रुपये व जुगाराचे साहित्‍य जप्‍त केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परळीत महिलेकडून बेकायदेशीर दारू जप्त
पुढील बातमी
सातारा तालुक्यातून युवती बेपत्ता; सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार

संबंधित बातम्या