सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी दोनजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, येथील सदरबझारमधील सारंग मंगल कार्यालयाच्या पाठिमागे दि. 21 रोजी रात्री 2 वाजता अस्तित्व लपवून बसल्याप्रकरणी सुदीप संजय मेंगळे (वय 19, रा. कोयना सोसायटी, सदरबझार, सातारा) याच्यावर, तसेच दि. 21 रोजी पहाटे 4.50 वाजता जगतापवाडी, शाहूनगर येथे अस्तित्व लपवून बसल्याप्रकरणी सौद अहमद खान (वय 21, रा. जगतापवाडी) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.