पिरवाडी येथे घरफोडी; 72 हजारांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 27 May 2025


सातारा : पिरवाडी येथे अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून बहात्तर हजार रुपयांचा ऐवज लांबवल्याची घटना दिनांक 23 ते 25 मे या दरम्यान घडली आहे. याप्रकरणी डॉक्टर पौर्णिमा सुनील फडतरे वय 41 रा. गोरखपुर, पिरवाडी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीच्या तक्रारीनुसार, अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. बेडरूमच्या लाकडी कपाटातील लोखंडी गोदरेजच्या लॉकरमधील तीन पासपोर्ट व सोन्याचे चार तोळ्याचे मंगळसूत्र असा 72 हजाराचा ऐवज त्याने लांबवला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार देशमुख करत आहेत. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सासरच्या त्रासास कंटाळून जावयाची आत्महत्या
पुढील बातमी
मालमत्तेच्या कारणावरून एकास मारहाण

संबंधित बातम्या