विधानसभा निवडणुकीसाठी फलटण विधानसभा मतदारसंघातून दोन दिवसात तीन, कोरेगाव मतदारसंघासाठी चार, कऱ्हाड उत्तरमधून एक, सातारा-जावळीसाठी एक, माण एक, कराड उत्तर दोन असे एकूण बारा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख २९ ऑक्टोबर असून ३० तारखेला अर्जांची छाननी होणार आहे. या आठ दिवसांच्या कालावधित शनिवार व रविवार सुट्टी असून अर्ज दाखल करावयास आता केवळ चार दिवस उरले आहेत. त्यामुळे येत्या चार दिवसात भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी शरद पवार पक्ष, शिवसेना उध्दव ठाकरे पक्ष हे मुख्य पक्ष वगळता आणखी इतर कोणते पक्षांचे व अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
सातारा : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील आठ
मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल सहा अपक्षांनी अर्ज
दाखल केले आहेत. त्यामुळे दोन दिवसात १३ अपक्षांचे अर्ज दाखल झाले आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
जिल्हास्तरीय चाचा नेहरू बालमहोत्सव समारोप उत्साहात साजरा
January 17, 2026
विषारी औषध प्राशन केल्याने महिलेचा मृत्यू
January 17, 2026
साताऱ्यात मंगळवार पेठेतून २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार
January 17, 2026
सातारा शहरात तीन दुकाने फोडून ७४ हजारांची रोकड लंपास
January 17, 2026
४० हजार रुपये किमतीच्या २०० किलो वजनाच्या अल्युमिनियम तारेची चोरी
January 16, 2026
सातारा एमआयडीसी व यशोदानगर येथून दुचाकी वाहनांची चोरी
January 16, 2026