सातारा : अस्तित्व लपवल्याप्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.
वाढे ता.सातारा येथे चेहरा लपवून फिरत असल्याचे समोर आल्याप्रकरणी मोहम्मद सरफराज अन्सारी (वय 34, रा.म्हसवे पो.वर्ये ता.सातारा) याच्याविरुध्द सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
घरात घुसून कोयत्याचा धाक दाखवत मारहाण केल्याप्रकरणी रामा हरी थोरात (रा.प्रतापसिंहनगर झोपडपट्टी) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी प्रवीण महेश अडागळे (वय 27, रा. प्रतापससिंहनगर) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 28 ऑक्टोबर रोजी घडली आहे.