सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : सर्पदंशाने महिलेचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अंजना चंद्रकांत आरगडे रा. आरगडवाडी, ता. सातारा यांना दि. 23 जुलै रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या पूर्वी राहत्या घरी सर्पदंश झाल्याने सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार वायदंडे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मणिपूर प्रकरणाचा जिल्हा महिला ओबीसी संघटनेच्या वतीने निषेध
पुढील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या

संबंधित बातम्या