12:06pm | Sep 04, 2024 |
सातारा : एकाच आधार कार्डवर लाडकी बहीणचे ३० अर्ज खारघरचे आधारकार्ड नंबर भरले. साताऱ्यात या मथळ्याखाली दैनिक लोकमत, सातारा दि.०३/०९/२०२४ रोजी बातमी प्रसिध्द झालेली आहे. सदर बातमीच्या अनुषंगाने तपासणी केली असता "मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना" ladakibahin.maharashtra.gov.in या नवीन पोर्टलवर प्रतीक्षा पोपट जाधव मु.पो.मायणी ता. खटाव जि. सातारा या २२ वर्ष वयोगटातील मुलीच्या नावाचे वेगवेगळ्या आधार कार्डचा वापर करुन अर्ज भरण्यात आलेले आहेत. सदयस्थितीत पोर्टलवर एकूण २८ अर्जांची माहिती प्राप्त झालेली आहे. एकूण किती अर्ज भरण्यात आलेले आहेत, याबाबत माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने त्रि सदस्य समिती गठीत केलेली असून त्यामध्ये श्रीमती रोहिणी ढवळे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी, महिला व बालविकास सातारा जिल्हा परिषद, सातारा, विजय तावरे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, सातारा व नितीन तळपे, लीड बँक मॅनेजर, बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा जिल्हा यांचा समावेश आहे. सद्यस्थितीत एकूण २८ अर्ज छाननी मध्ये निदर्शनास आलेले आहेत. सदर सर्व २८ अर्जामध्ये एकच नाव आहे व सर्व कागदपत्रे ,आधार कार्ड इतर कागदपत्रे ही एकच आहेत. तसेच अर्ज भरतेवेळी वेगवेगळ्या आधार कार्ड क्रमांकाचा वापर करण्यात आलेला आहे, असे दिसून येते. सद्यस्थितीत प्रतीक्षा पोपट जाधव या महिलेने ऑनलाईन अर्जासोबत माणदेशी महिला सहकारी बँक,शाखा मायणी,ता.खटाव,जि.सातारा या एकच बँक खात्याची माहिती पडताळणी केलेल्या सर्व २८ अर्जावर भरलेली असून फक्त रक्कम रुपये ३०००/- दिनांक २९/०८/२०२४ रोजी जमा झालेले आहेत. या व्यतिरिक्त सदर योजनेमधून इतर आधार कार्ड दिलेल्या क्रमांकावरून सदरची रक्कम रुपये ३०००/- जमा झाली नसलेबाबत सर्व अर्जात नमूद केलेल्या बँक खात्यावर वरून चौकशी समितीने खात्री केलेली आहे.
सदर घटनेचा सविस्तर अहवाल आजच सादर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या. त्यानुसार सद्यस्थितीमध्ये संबंधितांचे जाब जबाब नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. संबंधित महिलेने गूगल वरून वेगवेगळे आधार कार्ड क्रमांकाची माहिती प्राप्त करून घेऊन त्या क्रमांकाचा वापर करून अर्ज भरलेले आहेत .यामध्ये तिला तिच्या पतीने मदत केलेली आहे अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेच्या अनुषंगाने पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू आहे.
प्रशासनाच्यावतीने संबंधित आधारकार्ड क्रमांक यांच्याशी संलग्न असलेल्या बँक खात्याचा तपशील घेण्याची कारवाई करण्यात यावी, अशा सूचना लीड बँकेचे व्यवस्थापक यांना देण्यात आलेले आहेत.
सदर चौकशी समितीचा अहवाल प्राप्त झाला असून सदर अर्जदार महिला व तिचा पती यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाणे तालुका खटाव जिल्हा सातारा येथे गुन्हा नोंद केला असून त्यांना अटक करण्याचे प्रक्रिया सुरू आहे. या योजनेत सर्वोच्च स्तरावरील छाननीचे पालन केले जात असून संबंधित महिलेच्या खात्यात केवळ तीन हजार रुपये जमा झाले आहेत. सदर योजनेचे दररोज परीक्षण होत असून केवळ आधार सीडेड खाते क्रमांक असलेल्या लाभार्थ्यालाच या योजनेचा लाभ दिला जातो. तसेच एका लाभार्थ्याला एकाच वेळी लाभ मिळेल हे छाननी वेळी सुनिश्चित केले जाते.
आनेवाडी टोलनाक्यावर लष्करी जवानाचा अपघाती मृत्यू |
शिवसेना उबाठा गटाचे जीवन प्राधिकरण कार्यालयात आंदोलन |
शाहूनगरच्या नागरिकांचा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना घेराव |
सातारच्या खेळाडूंची राज्यस्तरावर स्पर्धेसाठी निवड |
सातारा मेगा फूड पार्क येथे २० सप्टेंबर रोजी अप्रेन्टिस योजना जनजागृती कार्यशाळेचे आयोजन |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
एकास जखमी केल्याप्रकरणी ट्रक चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनेत दोन विवाहिता बेपत्ता |
अल्पवयीन मुलीचे अपहरण |
हाणामारीच्या दोन घटनांमध्ये परस्परविरोधी गुन्हे |
वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी वरदान : डॉ. अतुल भोसले |
प्राधिकरणाच्या कंत्राटी कर्मचार्यांचे धरणे आंदोलन |
डीजेच्या दणदणाटात बाप्पाला 17 तासानंतर निरोप |
कराडमध्ये शनिवारपासून मराठी चित्रपट संगीत महोत्सव |
ऑनलाईन बांधकाम व बिनशेती प्रणालीचा खेळखंडोबा थांबता थांबेना |
कै. सौ. कलावती माने यांची पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी भावपूर्ण वातावरणात संपन्न |
कराडात पोलीस-गणेश मंडळाचे कार्यकर्ते आमने सामने |
आमदार शिवेंद्रसिंहराजे वगळता सर्व विद्यमान आमदारांचे भवितव्य धोक्यात : हेमंत पाटील |
मस्त्य व्यवसायासाठी ठेक्याने द्यावयाच्या १०९ पाझर तलावांसाठी जाहीर लिलाव |
औद्योगिक प्रशिक्षण संस्था वाई येथे संविधान मंदिराचा लोकार्पण सोहळा उत्साहात संपन्न |
परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयात राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह साजरा |