सातारा येथील आयशर शोरुममधील उघड्या वर्कशॉपमधून ३० हजारांचे साहित्य लंपास

by Team Satara Today | published on : 24 January 2026


सातारा  : चौगुले इंडस्ट्रिज प्रा. लि., सातारा येथील आयशर शोरुममधील उघड्या वर्कशॉपमधून सुमारे ३० हजार रुपये किमतीचे वाहनाचे सुटे पार्ट चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. दि. १४ रोजी सांयकाळी पाच ते दि. १५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान हा प्रकार घडला असून याप्रकरणी अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत दत्तप्रसाद नरहरी देशपांडे (वय - ३६, व्यवसाय - खाजगी - नोकरी, रा. मांगल्य अपार्टमेंट, मंगळवार पेठ, सातारा) यांनी सातारा शहर पोलिसांत शुक्रवारी (दि. २३) याबाबतची तक्रार दिली आहे.

याबाबत पोलिसांची माहिती अशी : दि. १४ रोजी सांयकाळी पाच ते दि. १५ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान येथील चौगुले इंडस्ट्रिज प्रा. लि. येथील आयशर शोरुमच्या उघड्या वर्कशॉपमध्ये उभ्या असलेल्या आयशर वाहनामधील सुटे पार्ट अज्ञात चोरट्यांनी लंपास केले.

चोरीस गेलेल्या साहित्यामध्ये १५,००० रुपये किमतीची अमरॉन कंपनीची १२ हॉल्टची बॅटरी, ५,००० रुपये किमतीची डॅशबोर्ड वायरिंग, २,००० रुपये किमतीचा गाडीचा सेन्सर, तसेच ३,००० रुपये किमतीचे इतर लोखंडी पार्ट यांचा समावेश आहे. या घटनेमुळे शोरुम परिसरातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. पुढील तपास सातारा शहर पोलिस करत आहेत.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
परळीत दारु अड्ड्यावर छापा; ९६० रुपयांच्या देशी दारुच्या १२ बाटल्या जप्त
पुढील बातमी
विवाहितेच्या छळप्रकरणी तिघांवर सातारा शहर पोलिसांत गुन्हा दाखल

संबंधित बातम्या