भैरवनाथ, जोगेश्वरी देवांचा पारंपारिक प्रदक्षिणा सोहळा उत्साहात

by Team Satara Today | published on : 22 December 2024


सातारा : गोडोली, ता. सातारा येथील श्री भैरवनाथ, जोगेश्वरी देवीची ग्रामप्रक्षिणा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी झाली होती.

गोडोली येथील श्री भैरवनाथ मंदिराचा  जिर्णोद्धार  झाला असून या मंदिरात श्री भैरवनाथ चा प्राणप्रतिष्ठापना व कलशरण सोहळा कार्यक्रम होत आहे. त्यापूर्वी श्री भैरवनाथ, जोगेश्वरी देवी, श्री गणपती, मारुती, शनी या देवांच्या मूर्तींची गावात तुतारी च्या निनादात वाद्यांच्या गजरात मोठ्या उत्साहात ग्राम प्रदक्षिणा व मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीची सुरुवात देवस्थानचे मानकरी शंकरराव मोरे पाटील, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भरत सकपाळ, सचिव व्यंकटराव मोरे, विश्वस्त माजी नगरसेवक शेखर मोरे पाटील, माजी उनगराध्यक्ष ऍड. डी. जी.बनकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली. यावेळी गावाचा संपूर्ण ग्रामप्रदर्शना मार्गावर महिलांनी आकर्षक अशी रांगोळी काढल्या. या मिरवणुकीमध्ये महिलांची लक्षणीय उपस्थिती होती. तसेच सर्व पुरुष मंडळींनी पांढरे कपडे व डोक्यावर गांधी टोपी घालून निवडणुकीची शोभा वाढवली होती. ठिकठिकाणी जल्लोषात मिरवणुकीचे स्वागत केले जात होते. 

आज दिनांक 22 रोजी सकाळी मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम सकाळी दहा वाजता सेवागिरी देवस्थान चे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या शुभहस्ते झाले. तसेच सगळ्या माहेरवाशिणी यांना साडी वाटप करण्यात आले. तसेच सायंकाळी सहा ते दहा या वेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम झाला.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्याच्या वाट्याला कॅबिनेटची वजनदार खाती
पुढील बातमी
सातारा जिल्ह्याची दळणवळण सुविधा आधुनिक करणार : मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांची प्रतिक्रिया

संबंधित बातम्या