सातारा : नागेवाडी (ता. सातारा) येथे पादचार्यास कारची धडक देऊन जखमी केल्याप्रकरणी एकावर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ऋषीकेश विजय दाणेकर (रा. मिरज रोड, सांगली) असे त्याचे नाव आहे. याबाबत प्रथमेश दत्तात्रय गुरव (रा. नागेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. दाणेकर यांच्या कारने दिलेल्या धडकेत ज्ञानदेव बाबुराव गुरव (वय 72, रा. नागेवाडी) हे जखमी झाले आहेत. याबाबतचा अधिक तपास हवालदार वायदंडे करत आहेत.
नागेवाडी येथे पादचार्यास कारची धडक
by Team Satara Today | published on : 26 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा