फलटण : फलटण येथे रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या लक्ष्मी विलास या निवासस्थानी वडूज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या बदनामीच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे व अन्य पोलीस अधिकारी हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी चौकशी करण्यासाठी आले होते. ही चौकशी जवळपास दोन तास करण्यात आली. परंतु, चौकशीबाबत जास्त माहिती समजू शकली नाही.