सातारा : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली रक्त घटक स्वतंत्र करण्याची सुविधा सध्या टेक्निकल सुपरवायझरच्या नियुक्तीत अडकली आहे. या नियुक्तीनंतरच दिल्लीतून आवश्यक असलेल्या मंजुरीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना सोसावा लागणारा आर्थिक भुर्दंड टाळण्यासाठी आवश्यक पदाची तातडीने नियुक्ती होणे आवश्यक आहे.
रक्तामध्ये लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट असे घटक असतात. वैद्यकीय क्षेत्रातील क्रांतिकारी संशोधनामुळे रक्तातील हे घटक स्वतंत्र करता येणे शक्य झाले आहे. रक्तविघटन प्रक्रियेद्वारे लाल रक्तपेशी, प्लाझ्मा व प्लेटलेट हे तीन घटक वेगवेगळे करून रुग्णाला त्याच्या आवश्यकतेनुसार देणे शक्य झाले आहे. त्यामुळे आवश्यकता नसतानाही संपूर्ण रक्त रुग्णाला द्यावे लागत नाही. रक्तक्षय, किडनी व हृदयविकार, तसेच पॅलेस्मियाच्या रुग्णांना रक्त वाढीसाठी लाल रक्तपेशींची गरज असते. भाजून जखमी झालेल्या, तसेच जलोदराचा आजार असलेल्यांना रक्तातील 'प्लाझ्मा' या घटकाची गरज असते, तर डेंगी व कर्करोगाच्या रुग्णांना 'प्लेटलेट' आवश्यक असतात. त्यांना संपूर्ण रक्त देण्याची गरज नसते. आवश्यक तो घटक दिल्यामुळे रुग्णाच्या प्रकृतीत तातडीने सुधारणा होते. मात्र, ही सुविधा खासगी रक्तपेढींमध्येच उपलब्ध आहे. प्रक्रियेसाठी लागणारे यंत्र व इतर खर्चामुळे रक्त घटकांचा दर संपूर्ण रक्तापेक्षा जास्त असतो. त्यामुळे अनेक रुग्णांना ते घेता येत नाही, तर अनेकांना नाइलाजास्तव हजारो रुपयांचा खर्च सोसावा लागतो.
रुग्णांची ही अडचण ओळखून शासनाने जिल्हा रुग्णालयामध्ये रक्त विघटनाची सोय उपलब्ध करण्याचा निर्णय सुमारे सात वर्षांपूर्वी घेतला होता. त्यानुसार रुग्णालयात मशिनही आल्या होत्या; परंतु आवश्यक असणारी इमारत उपलब्ध नव्हती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयासाठी आलेल्या मशिन पुन्हा पुण्याच्या मेट्रो ब्लड बँकेकडे पाठवल्या गेल्या आता इमारती उभी राहून सहा वर्षे झाली आहेत. पाच वर्षांपासून आवश्यक असणारी मशिनरीही उपलब्ध झाली आहे. कोरोना कालावधीत ही प्रक्रिया थंडावली होती; परंतु त्यानंतरही शासकीय पातळीवर ही बाब गांभीर्याने घेतली गेली नाही. ही यंत्रणा सुरू करण्यासाठी दिल्लीतून काही मंजुरी लागणार आहे. त्यासाठी अर्ज करण्यासाठी टेक्निकल सुपरवायझर हे पद भरणे आवश्यक आहे. याबाबत जिल्हा रुग्णालयाने शासनाशी पत्र व्यवहारही केला आहे; परंतु ते पद अद्याप भरण्यात आलेले नाही. त्यामुळे मंजुरीसाठी अर्ज करणेच खोळंबले आहे. जिल्हा रुग्णालयात ही सुविधा सुरू झाल्या सर्वसामान्यांचे हजारो रुपये वाचणार आहेत. त्यासाठी तातडीने पद भरतीबाबत कार्यवाही होणे आवश्यक आहे.गळफास घेवून युवकाची आत्महत्या |
संविधानाचा आधुनिक राष्ट्र निर्मितीचा संकल्प साकारण्याचे आव्हान : अन्वर राजन |
सातारा एसटी स्टँड परिसरातील बंद टपऱ्या हटवल्या |
जिल्ह्यात कॅबिनेट मंत्रीपदाचा मान कोणाकोणाला ? |
सहकारातील प्रतिकूल परिस्थितीतही गॅलेक्सीने निर्धाराने टाकलेले एकेक पाऊल यशस्वी झाले : रामभाऊ लेंभे |
ग्राहकांनी पाणी देयके 15 डिसेंबरपर्यंत भरावीत |
खा. उदयनराजेंच्या एका फोनने वाचला तरुणाचा जीव |
जनता सहकारी बँक साताराच्यावतीने रविवारी कार्यशाळा, प्रशिक्षण |
जनतेने एक विकासाभिमुख नेतृत्व विधान सभेमध्ये पाठवले : प्रा. दशरथ सगरे |
कराड येथील स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी समोर आत्मक्लेश आंदोलन |
चंद्रशेखर गावस, राजीव मुळ्ये यांना गुंफण पुरस्कार जाहीर |
ढगाळ वातावरणामुळे जिल्ह्यातील थंडी गायब |
दिव्यांग-अव्यंग व्यक्तींना विवाहास प्रोत्साहन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन |
फळबागांच्या उत्पादन वाढीसाठी पाडेगाव फार्म येथे खत व्यवस्थापन प्रात्यक्षिक |
पत्नीचा जाचहाट केल्याप्रकरणी पतीविरोधात गुन्हा |

अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
वृद्ध महिलेच्या फसवणूक प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोनजणांवर गुन्हा |
सातारा स्थानिक गुन्हे शाखेची पिस्टलची शतकी कारवाई |
पेरलेत झाडे तोडताना नियमांना 'फाटा' |