09:09pm | Apr 11, 2024 |
सातारा : साडेपाच महिन्यापासून गोडोली नाका येथे एकाचा खून करून फरार असणाऱ्या आरोपीला सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने बिहार राज्यातील गया येथून अटक केली आहे.
छोटू उर्फ नरेंद्र रामदिन चौधरी उर्फ पटेल वय 22 राहणार सिद्धांत नगर गया असे आरोपीचे नाव आहे. या आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
31 ऑक्टोबर 2023 रोजी किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणांमध्ये गोडोली येथे बालाजी सोमनाथ रेड्डी वय 27, रा. करंजे रोड, म्हसवे याचा धारदार शस्त्राने खून झाला होता. मयताचा भाऊ मनीष रेड्डी याने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र या प्रकरणातील संशयित बिहार मधून नेपाळ देशामध्ये पळून गेल्याने तो आढळून येत नव्हता.
सातारा शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याचा कौशल्यपूर्ण तपास सुरू ठेवला होता. यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे एक पथक अधिक तपासासाठी गया बिहार येथे रवाना झाले. गया येथे अनेक संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. मात्र त्यांची ओळख पटत नव्हती.
गोपनीय बातमीदारामार्फत सातारा पोलिसांनी नरेंद्र चौधरी याचा माग काढला. आपली ओळख लपवण्यासाठी त्याने दाढी आणि केस वाढवले होते. मात्र त्याच्या बोलण्यातून सातारा जिल्ह्यातील शहराचा उल्लेख आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली. त्यावेळी त्याने रेड्डी याचा आपण धारदार शास्त्राने खून केल्याची कबुली दिली. तब्बल साडेपाच महिने नरेंद्र रामदिन चौधरी हा पोलिसांना गुंगारा देत होता. पोलिसांनी त्याची तेथून गठडी आवळली आणि त्याला साताऱ्यात आणून येथील न्यायालयासमोर हजर केले असता त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
या तपासात डीबी पथकाचे सपोनि अविनाश माने, फौजदार सुधीर मोरे, पोलीस हवालदार सुजित भोसले, नीलेश जाधव, पंकज मोहिते, विक्रम माने इत्यादी सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |