सातारा : कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेसाठी खबरदारीचा उपाय म्हणुन प्रतापगड, ता. महाबळेश्वर येथील अफजलखान कबरीच्या सभोवतालच्या 300 मीटर परिसरात दिनांक 26 नोव्हेंबर २०२५ ते दिनांक 24 जानेवारी 2026 रोजीच्या मध्यरात्री पर्यंत भारतीय नागरिक संहिता 2023 चे कलम 163 नुसार प्रतिबंध करण्याचा आदेश तुषार दोशी पोलीस अधीक्षक सातारा यांनी जारी केला आहे. सदरचा आदेश दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजीचे 00.00 वाजले पासुन दिनांक 24 जानेवारी 2026 चे 24.00 वाजेपर्यंत अंमलात राहील, असे आदेशात नमुद आहे.
कायदा व सुव्यवस्थेसाठी अफजलखान कबरीच्या परिसरात पोलीस दलाकडून प्रतिबंध आदेश जारी
by Team Satara Today | published on : 25 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा