सातारा : सातारा शहरातून दुचाकीची चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी सकाळी 10 ते 12 वाजण्याच्या सुमारास सातारा शहरातील गणेश ज्वेलर्स दुकानाच्या समोर असलेल्या पार्किंग मधून अमित लक्ष्मण गाढवे रा. बोपर्डी, ता. वाई, जि. सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीए 7486 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार पोळ करीत आहेत.