साताऱ्यात मोळाचा ओढा परिसरात जुगार अड्ड्यावर कारवाई; रोख रक्कम व साहित्य जप्त

by Team Satara Today | published on : 29 November 2025


सातारा : मोळाचा ओढा परिसरातील शिंदे फर्निचरच्या मागील बाजूस असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीच्या आधारावर केलेल्या या कारवाईत पोलिसांनी ८३० रुपयांची रोख रक्कम आणि विविध जुगार साहित्य असा मुद्देमाल जप्त केला.

याबाबतचा अधिक  तपास पोलीस कॉन्स्टेबल मोरे हे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संशयास्पदरित्या अंधारात अस्तित्व लपवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा
पुढील बातमी
जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या