10:42pm | Dec 06, 2023 |
सातारा : राज्य घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध दलित संघटनांच्या वतीने आणि मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने दलित संघटनांच्या वतीने सातारा शहरातून दुचाकी रॅली काढण्यात आली होती.
डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्याकरता शाहू चौकामध्ये भीमसैनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. सातारा शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व गवई गट या दोन्ही गटाच्या माध्यमातून तसेच दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी शाहू चौकात विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. पैकी वंचित बहुजन आघाडीने मशाल रॅली घेऊन येणार्या कार्यकर्त्यांसाठी नगरपालिका कार्यालयासमोरील मोकळ्या जागेत सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. सकाळी दहा वाजल्यापासूनच मशाल रॅली घेण्यास सुरुवात झाली होती. शाहू चौक परिसर भीमसैनिकांनी गजबजून गेला होता. येथे चोख पोलिस बंदोबस्त तैनात होता. शाहू चौकाची एक बाजू बॅरिगेट लावून अडवण्यात आली होती.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील उद्यानाच्या नवीन कमानीचे यावेळी उद्घाटन करण्यात आले. पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोकबापू गायकवाड, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वरिष्ठ नेते दादासाहेब ओव्हाळ तसेच अनेक भीमसैनिकांनी पुतळ्याला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. यावेळी भीम वंदना करण्यात आली. माजी नगरसेवक बाळासाहेब खंदारे व पालिका कर्मचारी युनियनच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने सुद्धा येथील कॉंग्रेस कार्यालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून महापरिनिर्वाण दिनाचे स्मरण करण्यात आले.
सातारा पालिकेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी सभागृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी अभिजीत बापट, मुख्य अभियंता दिलीप चिद्रे, अभियंता शहाजी वाठारे, तसेच पालिकेचे विविध अधिकारी उपस्थित होते.
सुरक्षिततेच्या कारणास्तव सातारा जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांना तात्पुरत्या स्वरुपात बंद |
ॲडव्हर्टायझिंग असोसिएशन ऑफ सातारा (आस) ची स्थापना |
मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना तालुकास्तरीय आढावा समितीच्या सदस्य पदी नानासो उर्फ पिंटूशेठ इवरे |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |