प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी

by Team Satara Today | published on : 20 January 2025


सातारा : सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी स्मृती स्थळ, पोवई नाका शिवसृष्टी, बॉम्बे रेस्टॉरंट परिसरातील उड्डाण पूल आणि अजिंक्यतारा परिसरास भेट देऊन पाहणी केली. तसेच या संदर्भात सुरू असलेल्या व पूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली. 

26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन असल्याने शाहू स्टेडियम, शहरातील रस्ते त्यांची स्वच्छता व विद्युत रोषणाई संदर्भात मुख्याधिकारी श्री अभिजित बापट याना सूचना दिल्या. अजिंक्य तारा  परिसराची देखील पाहणी जिल्हाधिकारी सातारा यांनी केली आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी सातारा यांचे समवेत पालकमंत्री यांचे कार्यालयातील विशेष कार्य अधिकारी सुनील गाढे, रविराज जाधव हे देखील उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन
पुढील बातमी
आतड्यांमधील घाण स्वच्छ करण्यासाठी 'या' पद्धतीने बनवा कच्च्या पपईची चटणी

संबंधित बातम्या