सातारा : युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सन 2022 ते 10 जुलै 2025 दरम्यान सातारा शहरातील एका युवतीवर अत्याचार करून तिला धमकी दिल्याप्रकरणी अक्षय अमृत लाला मेहता रा. आझाद नगर, मोळाचा ओढा, सातारा याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर करीत आहेत.