भुईंज येथील भोसले टोळी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार; पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांचे आदेश

वाई उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डी. वाय. भालचिम यांनी केली प्रस्तावाची चौकशी

by Team Satara Today | published on : 30 September 2025


सातारा  : वाई तालुक्यातील भुईंज येथे कायदा सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या भोसले टोळीला पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपार केले आहे. या प्रस्तावाची चौकशी वाई उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक डी.  वाय.  भालचिम यांनी केली होती.

मयूर शिवाजी भोसले (वय 20, रा. खालचे चाहूर, भुईंज ता. वाई), संदीप सुरेश पवार (वय 24, रा.  भुईंज,  ता. वाई), विशाल सुभाष भोसले,अमर विलास माने (रा.  विराटनगर पाचवड वाई) या चौघांना सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. भुईंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने खंडणी, दरोडा, खुनाचा प्रयत्न, मारामारी, चार चाकी वाहन पेटवणे यासारखे गंभीर गुन्हे केले होते .त्यांना वेळोवेळी समज तसंच कायदेशीर कारवाई करूनही त्यांच्या वर्तनात फरक पडला नव्हता.

भुईंज पोलिसांच्यावतीने सादर करण्यात आलेल्या या प्रस्तावाची चौकशी उपाधीक्षक वाई डी.  वाय.  भालचिम यांनी केली. हद्दपार प्राधिकरणाचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी या प्रस्तावाच्या संदर्भात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार या टोळीला दोन  वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे आदेश दिले .सातारा जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हद्दपारी मोका एमपीडीए या सारख्या कारवाया सुरूच राहणार असल्याचा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी दिला आहे .सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, प्रमोद सावंत, अमित सपकाळ, राजू कांबळे, शिवाजी भिसे, अनुराधा सणस व सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते यांनी योग्य ते पुरावे सादर करत सहकार्य केले .


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कष्टकरी महिलांचा सत्कार त्यांना नवीन उर्जा देणारा; पद्मश्री डॉ ग गो जाधव ग्रंथालयाच्यावतीने नवदुर्गा सन्मानित

संबंधित बातम्या