सातारा : अपघात प्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, क्षेत्रमाहुली ता.सातारा येथे झालेल्या अपघात प्रकरणी अक्षय धस (रा.क्षेत्रमाहुली) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी गणपत वामन लोहार (वय 50, रा. क्षेत्रमाहुली) यांनी तक्रार दिली आहे. ही घटना दि. 3 डिसेंबर रोजी घडली आहे.