पंधराव्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदी हभप डॉ. सुहास फडतरे महाराज यांची निवड

by Team Satara Today | published on : 21 January 2026


सातारा  :  क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या 125 व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून प्रति सरकारच्या सातारच्या भूमीत लवकरच पंधरावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन संपन्न होणार आहे या संमेलनासाठी संयोजन समितीची स्थापना करण्यात आली असून वारकरी संप्रदायातील जेष्ठ कीर्तनकार हभप डॉ.  सुहास महाराज फडतरे यांची संयोजन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. कार्याध्यक्षपदी पत्रकार व साहित्यिक कॉ. विजय मांडके व  सरचिटणीसपदी एड. राजेंद्र गलांडे यांची निवड करण्यात आलेली आहे. 

पुणे येथे झालेल्या चौदाव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राचे अध्यक्ष व ज्येष्ठ विचारवंत कॉ. धनाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत सुटा संघटनेच्या सातारा येथील कार्यालयात विद्रोही सांस्कृतिक चळवळ व सातारा जिल्ह्यातील शिव, शाहू, फुले , आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराच्या पुरोगामी चळवळीतील लेखक , कलावंत , कार्यकर्ते यांच्या झालेल्या बैठकीत संयोजन समितीचे पदाधिकारी व संयोजन समिती स्थापन करण्यात आली.  

संयोजन समितीचे अन्य पदाधिकारी व सदस्य पुढीलप्रमाणे आहेत. मार्गदर्शक मंडळामध्ये  पद्मश्री लक्ष्मण माने,  ऍड. कॉ सयाजीराव पाटील ,  ऍड.  वर्षा देशपांडे, प्रा. डॉ. भास्कर कदम , कॉ.  भगवानराव भोसले, जयंत उथळे, भगवान अवघडे , प्रा. ए.पी. देसाई , प्रा दत्ताजीराव जाधव , एडवोकेट रवींद्र पवार तसेच सहकार्याध्यक्ष मिनाज सय्यद,  उपाध्यक्ष मधुसूदन मोहिते, प्राचार्य डॉ अरुण गाडे,  ऍड. दयानंद माने , प्रा. डॉ. आर.  के.  चव्हाण , गणेश भिसे ,  ऍड. शरद जांभळे , प्रा.  मंगला साठे, प्रा डॉ मृणालिनी आहेर ,रश्मी लोटेकर , 

संघटक म्हणून डॉ प्रशांत पन्हाळक ,  दिलीप भोस , कॉ. प्रमोद परामणे , अभिजीत भालेराव, गिरीश बनकर,  वामन गंगावणे , जयवंत खराडे , प्रा शंकर पवार, हणमंत सावंत , सौ.  नीलिमा हांडे- कदम तच खजिनदारपदी राहुल गंगावणे यांची निवड करण्यात आलेली आहे. 

संयोजन समितीमध्ये सातारा जिल्ह्यातील प्राध्यापक,  कलाकार,  साहित्यिक , सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांची सदस्य म्हणून निवड करण्यात संयोजन समितीमध्ये सातारा जिल्ह्यातील प्राध्यापक,  कलाकार ,  साहित्यिक , सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यकर्ते यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे.

विद्रोही चळवळीचा व विचारांचा वारकरी संप्रदायातील संतांच्या कार्याशी जवळून संबंध असल्याने संयोजन समितीचे अध्यक्षपदी हभ प डॉ सुहास फडतरे महाराज यांची एक मताने निवड करण्यात आल्याची माहिती डॉ भारत पाटणकर यांनी दिली. सातारा प्रति सरकार ,  सत्यशोधक चळवळ तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर , थोरले प्रतापसिंह महाराज  या सर्वांचा साताऱ्याशी असलेला संबंध यावर लेखन चर्चा आणि भेटी घडवून आणण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली अशी माहिती कॉ धनाजी गुरव यांनी दिली. 

सातारा जिल्ह्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अनुषंगाने वातावरण निर्मितीसाठी ठीक ठिकाणी आता बैठका व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्याचीही आखणी करण्यात आली आहे. 

या बैठकीला प्रा आनंद साठे , प्रा. डॉ. प्रकाश कांबळे. , प्रा. डॉ. विजय पवार , प्रा. गौतम काटकर,  किरणकुमार सांगळे, कुलदीप मोहिते  विजयकुमार कांबळे, दिलीप महादार, प्रा. डॉ. विजय माने , प्रा. डॉ. मनीषा शिरोडकर वगैरे अनेक जण उपस्थित होते. 

विद्रोही चळवळीचा व विचारांचा वारकरी संप्रदायातील संतांच्या कार्याशी जवळून संबंध असल्याने संयोजन समितीचे अध्यक्षपदी हभ प डॉ सुहास फडतरे महाराज यांची एक मताने निवड करण्यात आल्याची माहिती डॉ भारत पाटणकर यांनी दिली. सातारा प्रति सरकार ,  सत्यशोधक चळवळ तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर , थोरले प्रतापसिंह महाराज  या सर्वांचा साताऱ्याशी असलेला संबंध यावर लेखन चर्चा आणि भेटी घडवून आणण्याच्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा करण्यात आली अशी माहिती कॉ. धनाजी गुरव यांनी दिली. 

सातारा जिल्ह्यात विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या अनुषंगाने वातावरण निर्मितीसाठी ठीक ठिकाणी आता बैठका व कार्यक्रम घेण्यात येणार आहेत त्याचीही आखणी करण्यात आली आहे.  या बैठकीला प्रा आनंद साठे , प्रा. डॉ. प्रकाश कांबळे , प्रा. डॉ. विजय पवार , प्रा. गौतम काटकर,  किरणकुमार सांगळे , कुलदीप मोहिते , विजयकुमार कांबळे, दिलीप महादार ,  प्रा. डॉ. विजय माने , प्रा डॉ मनीषा शिरोडकर उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा तालुक्यात जि. प.,पं. स. निवडणुकीसाठी ४५ अर्ज दाखल; इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येने निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत
पुढील बातमी
पाटखळ गटातून रयत क्रांती पक्षाकडून संजना साबळेंचा अर्ज शक्तिप्रदर्शन करत दाखल

संबंधित बातम्या