11:15am | Dec 05, 2023 |
सातारा : सोनगाव ता. जावली येथील प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचा (अजिंक्यतारा -प्रतापगड साखर उद्योग समूहाचा) गळीत हंगाम जोमाने सुरु असून गाळपास आलेल्या ऊसाला २८५० रुपये प्रतिटन पहिली हप्ता देण्यात येत आहे. शेतकरी हित लक्षात घेऊन जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या तुलनेप्रमाणे अंतिम दर दिला जाणार आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपला ऊस प्रतापगड कारखान्याला घालून हंगाम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांनी केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात शिंदे यांनी म्हटले आहे कि, आपला हक्काचा कारखाना सुरू झाल्याने स्थानिकांसह बाहेरूनही चांगल्या प्रमाणात ऊस गाळपासाठी येत आहे. दि. ३० नोव्हेंबर रोजी मोठ्या धाडसाने आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी अजिंक्यतारा- प्रतापगड साखर उद्योगास गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रति टन रुपये २८५० पहिला हप्ता जाहीर करून नंतर योग्य त्या टप्प्यात रिकव्हरीनुसार पुढील हप्ता देण्यात येईल याबाबत ऊस उत्पादक सभासद व शेतकरी यांनी निश्चित रहावे, असे जाहीर केले होते. जाहीर केलेला उसाचा प्रतिटन रुपये २८५० हा अंतिम दर नसून हा केवळ पहिला हप्ता आहे, हे ऊस पुरवठादार सभासद- शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावे.
सातारा जिल्हयातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत स्पर्धात्मक व शेतकर्यांच्या हिताचा विचार करूनच अंतिम दर दिला जाणार आहे. तरी, सर्व ऊस उत्पादक सभासदांनी व शेतकर्यांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता अजिंक्यतारा - प्रतापगड कारखान्याला आपला ऊस घालून सहकार्य करावे व उस दराबाबत निश्चिंत रहावे, असे आवाहन चेअरमन शिंदे यांनी केले आहे. यावेळी संचालक दादा पाटील, बाळासाहेब निकम, प्रदीप तरडे आदी उपस्थित होते.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |