मुंबई, रायगड, नाशिक, पुणे, सातारा जिल्ह्यांतील घाट विभागात ऑरेंज अलर्ट

by Team Satara Today | published on : 28 September 2025


सातारा : पुढील २४ तासांसाठी या सर्व जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर राज्यातील पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दि. २९ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट विभागात अतिजोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली. 

पश्चिम विदर्भ आणि लगतच्या भागावर असलेल्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर आता ठळक कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. ते आता पश्चिम विदर्भ आणि लगतच्या उत्तर मध्य महाराष्ट्रावर आहे, तसेच एक कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र आज पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरापासून दक्षिण छत्तीसगड व उत्तर आंध्रप्रदेश किनारपट्टीवरून जात आहे.

त्यामुळे कोकण-गोव्यात पुढील चार ते पाच दिवस, तर मध्य महाराष्ट्रात दोन ते तीन दिवस बहुतांश जिल्ह्यांत जोरदार पाऊस पडेल. मराठवाडा आणि विदर्भातही मेघगर्जनेसह पाऊस पडेल. दि. २८ सप्टेंबर रोजी राज्यातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांतील घाट विभागात तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे नद्या-नाल्यांना आलेल्या पुराने धोक्याची पातळी ओलांडली. घर, शेतीमध्ये पाणी घुसले, पुलावरून पाणी वाहून लागल्याने गावातील संपर्क तुटला, परिणामी जनजीवन विस्कळीत झाले.

दि. २९ सप्टेंबर रोजी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट विभागात अतिजोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली असून, या सर्व जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे, तर मराठवाडा व विदर्भात सर्वच जिल्ह्यांत मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे असल्याचे याठिकाणी यलो अलर्ट देण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पांगारी गावाकडे जाण्याऱ्या रस्त्यावर बिबट्याचे दर्शन
पुढील बातमी
कास पठारावर दहा आसनी ई व्हेईकलचे उद्घाटन; पुष्प हंगामात पर्यटकांची मोठी सोयी

संबंधित बातम्या