सातारा : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 4 रोजी प्रशांत दत्तात्रय शिर्के रा. नेवेकरवाडी, पोस्ट करंडी, ता. जावली, जि. सातारा याने त्याच्या ताब्यातील दुचाकी ही रस्त्याच्या विरुद्ध दिशेने विना हेल्मेट, बेदरकारपणे चालवून कमरुद्दीन बादशहा फरास रा. नेले, (फरासवाडी) पोस्ट किडगाव, ता. सातारा यांच्या ताब्यातील मोटरसायकलला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने फरास यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पाठीमागे बसलेले नितीन शिवाजी वाघमोडे आणि दुचाकी स्वार शिर्के हे ही जखमी झाले आहेत. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नेवसे करीत आहेत.
एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा
by Team Satara Today | published on : 08 August 2025

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा