05:11pm | Sep 09, 2023 |
बंगळुरु : भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रोकडून चांद्रयान ३ बाबत अपडेट दिल्या जात आहेत. इस्त्रोनं २३ ऑगस्टला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान ३ उतरवून इतिहास रचला होता. २३ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या काळात विक्रम लँडरकडून काम सुरु होतं. तर, रोवर २ सप्टेंबर पर्यंत सुरु होता. चंद्रावर रात्र होणार असल्यानं प्रज्ञान रोवरला २ सप्टेंबरला तर विक्रम लँडरला ४ सप्टेंबरला स्लीप मोडवर पाठवण्यात आलं होतं. त्यानंतर ५ सप्टेंबरला चंद्रावर रात्र झाली. चंद्रावरील रात्रीमध्ये विक्रम लँडर कसा दिसतो याचा फोटो चांद्रयान २ च्या ऑर्बिटरकडून टिपण्यात आला आहे. चांद्रयान २ च्या ऑर्बिटरवर लावलेल्या खास कॅमेऱ्याद्वारे अंधारामध्ये चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरचा फोटो टिपला आहे.. ६ सप्टेंबर २०२ ला हा फोटो टिपण्यात आला आहे. यामध्ये चंद्राचा भूभाग निळा, हिरवा आणि काळ्या रंगाचा असल्याचं दिसून येतं. चांद्रयान २ च्या ऑर्बिटरनं टिपलेल्या फोटोमध्ये पिवळ्या रंगाचा चमकणारा भाग दिसत आहे तो चांद्रयान ३चा विक्रम लँडर दिसून येत आहे. इस्त्रोनं चांद्रयान २ च्या ऑर्बिरटनं टिपलेले दोन फोटो शेअर केलेल आहेत. पहिला फोटो जून महिन्यातील आहे. तर दुसरा फोटो चांद्रयान ३ चंद्रावर उतरल्यानंतरचा ६ सप्टेंबरचा आहे. इस्त्रोनं एकूण तीन फोटो शेअर केले आहेत. हे फोटो चांद्रयान २ वरील एल एस ड्युअल फ्रिक्वेन्सी सिंथेटिक अपार्चर रडार द्वारे टिपण्यात आले आहेत. इस्त्रोनं जून महिन्यातील फोटो आणि ६ सप्टेंबरचा फोटो शेअर करुन विक्रम लँडरचं स्थान निश्चित केलं आहे. DFSAR उपकरण काढू शकतं अंधारात फोटो? DFSAR हे एक असं उपकरण आहे जे अंधारात हाय रिझोल्यूशन पोलैरीमेट्रिक मोडमध्ये फोटो काढतं. म्हणजेच तें अंधारात धातूमधून निघाणारी उष्णता आणि प्रकाश टिपतं. याचं वैशिष्ट्य म्हणजे तो नैसर्गिकरित्या निर्माण झालेला धातू असेल किंवा मानवनिर्मित धातू असू शकेल.चांद्रयान २ च्या ऑर्बिटरनं २५ ऑगस्ट २०२३ ला देखील चांद्रयान ३ च्या विक्रम लँडरचा फोटो टिपला होता.
आरळे येथे जुगारावर कारवाई |
हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन |
सातारा शहर परिसरातून दोन दुचाकींची चोरी |
टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने कराड, साताऱ्यामध्ये सुरु केले 'ड्यूराशाईन® शॉपी’ |
छत्रपती शिवाजी महाराज हेच मोदीजींचे प्रेरणास्थान |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
मराठा आरक्षण प्रश्नावर भूमिका घेण्याची शरद पवारांना गळ |
सातारा-पंढरपूर मार्गावर माहुली ग्रामस्थांचा रास्ता रोको |
सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू |
निंभोरे आरोग्य केंद्रासाठी एक एकर जागा दान |
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळले सांबराचे अवशेष |
इतर कारखान्यांच्या तुलनेने 'प्रतापगड' अंतिम दर देणार |
एकाची गळफास घेवून आत्महत्या |
पुरुष भिक्षेकरी गृहात एकाचा मृत्यू |
टेंम्पोमधून अज्ञात चोरट्याने केली सुमारे 19 लाखांची रोकड लंपास |
परमिट रूमच्या स्टोअरमधून 30 हजार रुपयांच्या दारूच्या बाटल्या लंपास |
सफाई मजदूर कॉंग्रेसची जिल्हा रुग्णालयात गांधीगिरी |
साताऱ्यात अंगणवाडी सेविकांची निदर्शने |
भाजपा कार्यकर्त्यांचा साताऱ्यात जल्लोष |
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी घेतला जिल्ह्यातील मतदार नोंदणीसह विविध विषयांचा आढावा |
सातारच्या श्लोक घोरपडेने रोवला मानाचा तुरा |