घरफोडीत सुमारे 80 हजारांचा ऐवज लंपास

by Team Satara Today | published on : 31 July 2023


सातारा : घरफोडीत अज्ञात चोरट्याने सुमारे 80 हजारांचा ऐवज लंपास केल्याची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 ते 29 जुलै दरम्यान वैभव पांडुरंग पिसाळ मूळ रा. ओझर्डे, तालुका वाई सध्या रा. चिमणपुरा पेठ, सातारा यांच्या ओझर्डे येथील घराच्या दरवाज्याचा अज्ञात चोरट्याने कडी कोयंडा तोडून घरामधील सुमारे 80 हजार रुपये किंमतीच्या सोन्याच्या प्रत्येकी अर्धा तोळा वजनाच्या चार अंगठ्या चोरून नेल्या आहेत. याबाबतची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक भंडारे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
युवती बेपत्ता
पुढील बातमी
गोडोली येथून दुचाकीची चोरी

संबंधित बातम्या