गरम पाण्याची बदली अंगावर पडून भाजून जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू; दि. २६ ऑक्टोबर रोजी घडली होती साताऱ्यातील मल्हारपेठेत घटना

by Team Satara Today | published on : 15 November 2025


सातारा : साताऱ्यातील मल्हारपेठेत खेळताना बाथरूममध्ये गरम पाण्याची बादली अंगावर पडल्याने देवांश अमोल शिंदे (वय ५) याचा भाजून उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. २६ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता पाच वर्षीय देवांश हा घरात खेळत असताना बाथरूममध्ये खेळत गेला. यावेळी अंघोळीसाठी गरम करण्यात आलेल्या बदलली त्याचा धक्का लागला. यावेळी गरम पाणी त्याच्या अंगावर पडल्याने तो गंभीररीत्या भाजला .

घरच्यांनी तातडीने त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले. दि.  २७ ऑक्टोबर रोजी त्याला ससून रुग्णालय,पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. आठ दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते. उपचारा दरम्यान डॉक्टरांनी दि. ३ नोव्हेंबर रोजी त्याला मृत घोषित केले.या घटनेची नोंद बंडगार्डन पोलीस ठाण्यात झाली असल्याची माहिती बंडगार्डन पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार व्ही. के. बडे यांनी दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा नजिकच्या उड्डाणपूलावरील वेग नियंत्रण रामभरोसे ; नवले पुलावरील अपघाताच्या पुनरावृत्तीची भिती
पुढील बातमी
शाहूपुरी पोलिसांनी १५ लिटरच्या ताडीच्या बाटल्या केल्या जप्त

संबंधित बातम्या