कराड येथे 18 जुलै रोजी रोजगार मेळाव्याचे आयोजन

by Team Satara Today | published on : 11 July 2025


सातारा :  जागतिक युवा कौशल्य सप्ताहानिमित्त सातारा जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांसाठी 18 जुलै रोजी  रोजी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सातारा व कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे याचा बेरोजगार उमेदवारांनी लाभ घ्यावा.

या रोजगार मेळाव्यात कुशल/अर्धकुशल कामगार अशा सदर मेळाव्यात 10 वी, 12 वी, पदवीधर, आयटीआय सर्व ट्रेड, डिप्लोमा, इंजिनिअर अशा  प्रकारचे एक हजार पेक्षा जास्त रिक्तपदे https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अधिसूचित केलेली आहेत. तरी नोकरी इच्छुक उमेदवारांनी 18 जुलै रोजी  कृष्णाकाठ इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, मंगळवार पेठ, कराड नगरपरिषदेजवळ कराड  येथे आपली शैक्षणिक कागदपत्रे घेऊन प्रत्यक्ष उपस्थित राहावे. मेळाव्यात सहभागी झालेल्या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येणार आहेत. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाच्या ०२१६२-२३९९३८ या दुरध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त सुनिल पवार यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माणमधील शेतकर्‍यांच्या अडचणी सोडवा : खा. धैर्यशील मोहिते-पाटील
पुढील बातमी
घाटात दरड कोसळल्याने महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग बंद

संबंधित बातम्या