सातारा : वाईन शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी 36 हजारांची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 ते 11 दरम्यान शेटे चौक, गुरुवार पेठ, सातारा येथील गुलमोहर वाईन शॉप च्या शटर चे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी शॉप च्या गल्ल्यात ठेवलेले 36 हजार रुपये रोख चोरून नेले आहेत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार सपकाळ करीत आहेत.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा