खंडाळ्यानजीक कालव्यात तरुणाचा आढळला मृतदेह

by Team Satara Today | published on : 05 March 2025


खंडाळा : धोम- बलकवडी कालव्यात पोहण्यासाठी गेलेला तरुण दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाला होता. त्याची शोधमोहीम सुरू असताना खंडाळ्यानजीक कालव्यात त्याचा मृतदेह आढळून आला. मच्छिंद्र गोपाळ रोमण (वय ३६, रा. रोमणवाडी, ता. पुरंदर, जि. पुणे) असे मृताचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी, अतिट (ता. खंडाळा) येथील यात्रेसाठी मच्छिंद्र रोमण आला होता. तो मित्रांसह धोम- बलकवडी कॅनॉलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने रोमण बुडाल्याची घटना शनिवारी घडली होती. दोन दिवसांपासून त्याचा शोध सुरूच होता. दरम्यान, आज हरिपूर- पवारवाडी गावच्या हद्दीत खंबाटकी घाटाच्या पायथ्याशी असणाऱ्या कॅनॉलच्या पुलाजवळ त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेची नोंद शिरवळ पोलिस ठाण्यात झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारताविरूद्धच्या पराभवानंतर स्टीव्ह स्मिथने घेतली निवृत्ती
पुढील बातमी
कामगार हॉस्पिटलसाठी सातारा येथे भूखंड मंजूर

संबंधित बातम्या