09:08pm | Apr 11, 2024 |
सातारा : सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रमजान ईद ईद-उल-फित्र हा मुस्लिम बांधवांचा पारंपारिक सण उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्यात ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी मशिद तसेच ईदगाह मैदानावर नमाज पठण केले. यानंतर एकमेकांना आलिंगन देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद च्या निमित्ताने फळ आणि सुकामेवा बाजारामध्ये मोठी उलाढाल झाली.
सातार्यातील सदर बाजार येथील ईदगाह मैदानावर सातारा शहर पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्यासह सातारा पोलिसांनी मुस्लिम बांधवांची गळाभेट घेऊन त्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या. तसेच पोलिसांनी मुस्लिम बांधवांना नमाज पठणानंतर गुलाब पुष्प भेट देऊन आपला भाईचारा दाखवून दिला. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश तांबे, सहायक पोलीस निरीक्षक विलास शितोळे इत्यादी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीसुद्धा सदर बाजार येथील ईदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवांना सकाळी शुभेच्छा दिल्या. या रमजान सणानिमित्त सर्वांमधील सलोखा, प्रेम, बंधुभाव कायम राहो, अशी मी अल्लाह चरणी प्रार्थना करत असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले.
खासदार उदयनराजे भोसले यांनीही लोकसभा प्रचाराची व्यस्तता असतानाही विशेष संदेशाद्वारे सातार्यातील बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सातार्यात सुद्धा रमजानचा उत्साह दिसून आला. गेल्या एक आठवड्यापासून बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती. रमजानच्या पूर्वसंध्येला दूध, सुकामेवा, कपड्यांच्या खरेदीसाठी मुस्लिम बांधवांची गर्दी दिसून आली. चंद्र दर्शन झाल्यानंतर दुसर्या दिवशी रमजान ईद साजरी केली जाते. सातारा शहरातील सदर बाजार व राजपथ, शाही मशिद, गेंडामाळ नाका येथील ईदगाह मैदान येथे मुस्लिम बांधवांनी पारंपारिक पद्धतीने नमाज पठण केले. सातारा शहरात शुक्रवारी दिवसभर सर्वधर्मीय नागरिकांनी मुस्लिम बांधवांना ईद च्या शुभेच्छा दिल्या. तसेच मनाचा गोडवा वाढवणार्या शीरखुर्माचा आस्वादही घेतला.
सोशल मीडियावर सुद्धा रमजान ईद च्या शुभेच्छांचा वर्षाव झाला. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रमजान ईद निमित्त शुभेच्छांचे फ्लेक्स बोर्ड लावण्यात आले होते.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |