सातारा : सातारा शहराला पाणीपुरवठा करताना आवश्यक असणार्या शेंद्रे सब स्टेशनच्या वीज पुरवठ्यामध्ये व्यत्यय येत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीकडून वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे. परिणामी पंपिंग स्टेशनमध्ये विस्कळीतपणा येत असल्याने कास व शहापूर पाणीपुरवठा योजनेचा पाणीपुरवठा एक दिवसासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सातारा नगरपालिकेने टाकीनिहाय पाणी कपातीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. याबाबतची माहिती मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिली आहे.
पत्रकात नमूद आहे की, सातारा शहराच्या काही भागास पाणीपुरवठा कास तलावातून होत आहे. नवीन पाईपलाईनचे काम सुरू आहे. हे काम करताना जुनी पाईपलाईन काही प्रमाणात लिकेज होत आहे. त्यामुळे कास उद्भवातून पाणीपुरवठा पूर्ण क्षमतेने होत नसल्याने शहराच्या काही भागात कमी क्षमतेने पाणीपुरवठा होत आहे. तसेच उरमोडी नदीतून पाणी उचलताना शेंद्रे सब स्टेशन येथे खंडित वीज पुरवठ्यामुळे पूर्ण क्षमतेने टाक्या भरल्या जात नाहीत. त्यामुळे उरमोडी कार्यक्षेत्रातील शहराच्या भागांना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही.
यामुळे कास माध्यमातील व शहापूर माध्यमातील प्रत्येक भागामध्ये एक दिवसाचा शटडाऊन ठेवणे आवश्यक ठरले आहे. 16 ऑगस्ट पासून ही पाणी कपात लागू होणार आहे. सातारा शहरातील नागरिकांनी काटकसरीने पाणी वापरून सहकार्य करावे, असे आवाहन बापट यांनी केले आहे.
वेळापत्रक पुढीलप्रमाणे -
कास उद्भव कार्यक्षेत्र
सोमवार - भैरोबा टाकी, मंगळवार - व्यंकटपुरा टाकी, बुधवार - कात्रेवाडा टाकी, गुरुवार -गोल टाकी मेन लाईन दुसरा झोन सकाळी सात ते सकाळी आठ, शुक्रवार - मेन लाईन गोल टाकी सकाळी सहा ते सकाळी सात, शनिवार कोटेश्वर टाकी, रविवारी खापरी लाईन बंद चार इंची व तीन इंची लाईन बंद गुजर आळी लाईन गुरुकुल टाकी.शहापूर उदभव क्षेत्र
सोमवार - यशवंत गार्डन टाकी, मंगळवार - घोरपडे टाकी, बुधवार -गणेश टाकी, गुरुवार टाकी, गुरुवार - राजवाडा टाकी, शुक्रवार -गणेश टाकी दुपार सत्र, शनिवार - बुधवार टाकी देवी चौक घंटेवारी, रविवार - घोरपडे टाकी सकाळ सत्र.