अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा

by Team Satara Today | published on : 15 November 2024


सातारा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार करुन तिला गर्भवती ठेवल्‍याप्रकरणी केशव दराडे या युवकावर सातारा तालुका पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. अत्‍याचाराची घटना जानेवारी ते जुलै २०२४ या कालावधीत वेळोवेळी घडली आहे. मुलगी या घटनेने घाबरली होती. तसेच तिला त्रास होवू लागल्‍यानंतर वैद्यकीय तपासणीमध्ये ती गर्भवती असल्‍याचे कुटुंबियांना समजले. यावरुन पिडीत मुलीने सातारा तालुका पाेलिस ठाण्यात तक्रार दिली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पत्नीच्या खून प्रकरणी पतीविरोधात गुन्हा
पुढील बातमी
निवडणूक कालावधीत ओपिनियन आणि एक्झिट पोलला प्रतिबंध

संबंधित बातम्या