सातारा : सातारा शहरासह वाई तालुक्यातील वेगवेगळ्या घटनेत चाैघेजण बेपत्ता झाले आहेत. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांत फिर्यादी दाखल झाल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक विवाहिता ८ वर्षाच्या मुलीसह बेपत्ता झाली आहे. ही घटना दि. ६ ऑक्टोबर रोजी घडली आहे. सातारा तालुक्यातील गावात ही घटना घडली असून सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.
दुसऱ्या घटनेत, निलेश एकनाथ घाडगे (वय ३५, रा.राउतवाडी, ता.वाई) हे दि. ४ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले आहेत. सातार्यातील सिव्हीलमध्ये जातो, असे सांगून ते घरातून बाहेर पडले. मात्र परत आले नाहीत. अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.
तिसर्या घटनेत, शिवाजी हणमंत दळवी (वय ४५, रा. संभाजीनगर) हे दि. २ ऑक्टोबर रोजी बेपत्ता झाले आहेत. सातारा शहर पोलीस ठाण्यात याची नोंद झाली असून अधिक तपास महिला पोलीस हवालदार पाटील करीत आहेत.