सातारा : दारुला पैसे न दिल्याच्या कारणावरुन अल्पवयीन मुलास मारहाण केल्याप्रकरणी चारजणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दारुला पैसे मागितल्यानंतर पैसे नसल्याचे सांगितल्याने चिडून जावून चौघांच्या टोळक्याने अल्पवयीन मुलाला मारहाण केली. औदुंबर भालेराव, रुद्र भालेराव, ओंकार भालेराव तिन्ही रा. प्रतापसिंहनगर सातारा, दत्ता रा. कृष्णानगर, सातारा (पूर्ण नावे, वय, पत्ता माहित नाही) यांच्या विरुध्द जखमी झालेल्या 16 वर्षीय मुलाने सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 31 मे रोजी एमआयडीसी येथे घडली आहे. संशयितांनी रॉड तसेच कोयत्याच्या उलट्या दांड्याने मारहाण केली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करीत आहेत.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
