सातारा : अनाधिकृतपणे खाजगी जागेत प्रवेश केल्याप्रकरणी चार जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास डॉ. ऋचा किशोर शिंदे रा. पीरवाडी, सातारा यांच्या जागेत अनधिकृतपणे प्रवेश केल्याप्रकरणी तेथीलच अशोक बजरंग बोराटे, सुरेश श्रीरंग बोराटे, मनोहर श्रीरंग बोराटे, अशोक बजरंग बोराटे यांचा मुलगा (पूर्ण नाव माहित नाही) यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.