सातारा एमआयडीसीतील लोकमंगल विद्यामंदिरात आज 21 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन

by Team Satara Today | published on : 08 April 2026


सातारा :  अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा सातारा, लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्था सातारा व लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर एम.आय.डी.सी., सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने 21 वे मराठी बालकुमार साहित्य संमेलन बुधवार, दि. 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी 8 ते 11.15 या वेळेत लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर, एम.आय.डी.सी., सातारा येथे आयोजित करण्यात आले आहे.

या संमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे कार्यवाह डॉ. दिलीप गरुड उपस्थित राहणार असून संमेलनाध्यक्ष म्हणून माजी विद्यार्थी व स्टेट बँक ऑफ इंडियाचे (होम लोन) सेल्स मॅनेजर विजय गायकवाड कार्यभार सांभाळणार आहेत.

कार्यक्रमास लोकमंगल ग्रुप शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तसेच अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा सातारा अध्यक्ष शिरीष चिटणीस, तसेच अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था पुणे शाखा सातारा यांच्या अध्यक्षा सौ. शिल्पा चिटणीस यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. कार्यक्रमाचे आयोजन शशिकांत जमदाडे (कोषाध्यक्ष), सौ. नंदा पवार (कार्यवाह), श्रीमती विद्या बाबर (मुख्याध्यापिका, लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी सातारा) आणि ज्योती नलवडे (मुख्याध्यापिका, लोकमंगल प्राथमिक विद्यामंदिर एमआयडीसी सातारा) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 8 वाजता उद्घाटन, दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन, प्रास्ताविक व मान्यवरांच्या मनोगताने होणार आहे. त्यानंतर सकाळी 9.30 ते 11.15 या वेळेत विद्यार्थ्यांकडून कथाकथन, काव्यगायन, श्लोक व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जाणार आहेत. या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचन, लेखन व साहित्याची आवड निर्माण व्हावी तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, हा उद्देश आयोजकांनी व्यक्त केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
हद्दपार आदेशाचा भंग केल्याप्रकरणी मोळाचा ओढा येथील एकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
कोरेगावातील लाच प्रकरणातील पुरवठा निरीक्षण अधिकारी फरार, साथीदाराला एक दिवसाची पोलीस कोठडी

संबंधित बातम्या