कराड : सातारा लोकसभा मतदार संघाच्या पाटण विधानसभा मतदार संघातील साजुर या गावातील ३५८ मतदान केंद्र हे जुने साजुर गावात आहे. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळे हे मतदान केंद्र एक किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरी करण्यात आले आहे.
प्रशासनाने वस्तुस्थितीची पाहणी न करता गुगल मॅपवर केंद्र निश्चीत केले आहे. त्याचा निषेध म्हणून साजुर जुन्या गावातील ३६८ मतदान केंद्रावरील मतदार हे मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सदस्य विजय चव्हाण यांनी दिली.
चव्हाण म्हणाले, सातारा लोकसभा मतदार संघातील पाटण विधानसभा मतदार संघातील साजुर या गावातील ३५८ मतदान केंद्र हे जुने साजुर गावात आहे. मात्र यावर्षी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाच्या चुकीमुळे हे मतदान केंद्र एक किलोमीटर अंतरावरील जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरीत करण्यात आले आहे.
स्वातंत्र्यानंतरच्या आजपर्यंतच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या सर्व निवडणुका या मतदान केंद्रावर होत होत्या. सुमारे ८०० मतदार याठिकाणी आहेत. सध्या उन्हाचा कडाका वाढला असताना एक किलोमीटर जुन्या साजुर गावातील लोकांना मतदानासाठी जावे लागणार आहे.
त्यामुळे त्यांची गैरसोय होणार आहे. ही प्रशासनाची चुक आहे. त्यासाठी पाटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांना यासंदर्भातील माहिती देवुन मतदान केंद्र पुर्ववत जुन्या गावात ठेवण्याची मागणी केली.
मात्र त्यांनी गुगल मॅपवर आम्ही मतदान केंद्र निश्चीत केल्याचे सांगीतले. वस्तुस्थितीची पाहणी न करता मतदारांची गैरसोय कशी होईल हे प्रशासनाने बघितले आहे. त्यामुळे प्रशासनाचा निषेध म्हणून साजुर जुन्या गावातील ३६८ मतदान केंद्रावर मतदान करणारे मतदार हे मतदानावर बहिष्कार टाकणार आहेत.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |

बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |