सातारा : अपघातात एका महिलेस जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकाविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 9 रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास श्रीमती वनिता लहू घाडगे रा. देगाव पाटेश्वर, ता. सातारा या पाटेश्वर ते बस स्टॉप जाणाऱ्या रस्त्यावर पायी चालत जात असताना संजय विलास साळुंखे रा. देगाव, ता. सातारा याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकल क्र. एमएच 11 टीसी 82 ने घाडगे यांना जोरदार धडक दिली. या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. अधिक तपास पोलीस नाईक व्ही. व्ही. मोरे करीत आहेत.