वडूथ येथे एकाचा खून केल्‍याप्रकरणी एकास अटक

by Team Satara Today | published on : 31 July 2023


सातारा : वडूथ ता.सातारा येथे आरडाओरडा करु नको, असे म्‍हटल्‍याच्या कारणातून चिडून जावून चाकूने पोपट गुलाब मदने (वय ६५, रा.वडूथ) यांच्यावर वार करुन खून केल्‍याप्रकरणी उमेश गुलाब राठोड (वय ३६) याला तालुका पोलिसांनी अटक केली. ही घटना रविवारी रात्री घडली असून संशयिताने आणखी एकावर वार केलेले आहेत.
सागर पोपट मदने (रा.वडूथ) यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. 
याबाबत अधिक माहिती अशी, ही घटना रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तक्रारदार सागर त्‍यांचे वडील पोपट मदने हे कुटुंबियांसोबत एकत्र राहत आहेत. मदने व राठोड एकाच परिसरात जवळजवळ राहत आहेत. रविवारी रात्री उमेेश राठोड हा आरडाओरडा करत होता. घरामध्ये वृध्द माणसे व लहान बाळ असल्‍याने मदने कुटुंबियांनी उमेश याला आरडाओरडा करु नको, असे म्‍हटले. यातून वादावादीला सुरुवात झाली. पाहता पाहता वाद विकोपाला गेला व चिडलेल्‍या उमेश याने याने धारदार चाकू काढून पोपट मदने यांच्या छातीवर सपासप वार केले. यात पोपट मदने गंभीर जखमी होवून रक्‍तबंबाळ झाले. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
घटनेनंतर पोलिसांनी रात्री लगेच संशयिताला ताब्यात घेतले. पो. नि. विश्वजीत घोडके पुढील तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एकाच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा
पुढील बातमी
अस्तित्व लपविल्या प्रकरणी एकावर कारवाई

संबंधित बातम्या