सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश 23 जानेवारीपर्यंत लागू : जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील

by Team Satara Today | published on : 12 January 2026


सातारा  : सातारा जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार अगर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये म्हणून महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम  (सुधारणा अध्यादेश) महाराष्ट्र पोलीस अधिनियम 2014 चे कलम  37 (1) (3) अन्वये दिनांक   23 जानेवारी रोजीच्या  रात्री 12 वाजेपर्यंत शस्त्र व जमाव बंदी आदेश जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील यांनी जारी केला आहेत.

हा आदेश यात्रा, धार्मिक कार्य, लग्न विधी कार्य, अंत्यविधी कार्य  तसेच ज्या लोकांना शांततेच्या मार्गाने एकत्र जमून कोणताही कार्यक्रम साजरा करावयाचा असेल त्याचवेळी पोलीस अधीक्षक, संबंधित उपविभागीय पोलीस अधिकार, तसेच संबंधित  पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरिक्षक यांची आगावू परवानगी घेतली असेल तर त्यांना सदरचा आदेश लागू होणार नाही, असे आदेशात नमूद आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासाचा नवीन आराखडा तयार करणार - पालकमंत्री मकरंद पाटील यांच्याकडून जिजाऊं माँसाहेबांना अभिवादन
पुढील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

संबंधित बातम्या