गोडोली येथील भैरवनाथ मंदिर कलशारोहण सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रम

by Team Satara Today | published on : 19 December 2024


सातारा : गोडोली गावातील भैरवनाथ मंदिराच्या कलशारोहण सोहळ्यानिमित्त दि. 21 ते 24 डिसेंबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, याची माहिती भैरवनाथ मंदिर संयोजन समितीच्या वतीने देण्यात आलेली आहे.

गोडोली गावातील भैरवनाथ मंदिर स्थापत्य कलेचा आविष्कार असलेले हेमाडपंथी मंदिर आहे. या मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे भोसले व कॅबिनेट मंत्री आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती आहे. शनिवार दिनांक 21 रोजी सायंकाळी चार वाजता श्रींच्या मूर्तीची ग्रामप्रदक्षिणा, दिनांक 22 डिसेंबर रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना शनैश्वर देवस्थान सोळशी चे परमपूज्य नंदगिरी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या निमित्ताने कांचनताई शेळके यांच्या सुश्राव्य कीर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी सहा ते नऊ दरम्यान होणार आहे

सोमवार दिनांक 23 डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता पुसेगाव देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज यांच्या हस्ते कलशारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा ते नऊ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 24 डिसेंबर रोजी हरिभक्त परायण सावता महाराज फुले यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कुलगाम येथे दहशतवादी अन् सैन्य दलात मोठी चकमक
पुढील बातमी
पुसेगाव येथे सुमारे सव्वा सात लाखांची घरफोडी

संबंधित बातम्या