राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत उपांत्यपूर्व सामन्यात सातारच्या शानभाग विद्यालयाचे खेळाडू

वेदांत सुनील निकम व पृथ्वीराज पंकज शिंदेने उत्कृष्ट बॉक्सिंगचे प्रदर्शन केले.

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : येथील श्यामसुंदरी रिलीजियस अँड चॅरिटेबल सोसायटीच्या के .एस. डी .शानभाग विद्यालय आणि जुनियर कॉलेजच्या बॉक्सिंग खेळाडूंनी स्पृहणीय यश मिळवले आहे.

नागपूर येथे सुरू असलेल्या मुलांच्या राज्य अजिंक्यपद बॉक्सिंग स्पर्धेत शानभाग विद्यालयाचा खेळाडू वेदांत सुनील निकम याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत पिंपरी चिंचवड शहर विरोधी खेळाडू चा सामना तिसऱ्या राउंड मध्ये जिंकून उपांत्यपूर्व सामन्यामध्ये प्रवेश केला.

तसेच  शानभाग  महाविद्यालयाचा  खेळाडू पृथ्वीराज पंकज शिंदे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत जळगाव शहर विरोधी खेळाडूचा सामना पहिल्या राउंड मध्ये जिंकून उपांत्यपूर्व  सामन्यामध्ये प्रवेश केला. त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले तसेच त्याच्या पुढील वाटचालीसाठी शाळेचे संस्थापक अध्यक्ष रमेश शानभाग, विश्वस्त सौ.उषा शानभाग, संचालिका सौ.आचल घोरपडे, मुख्याध्यापिका सौ.रेखा गायकवाड (माध्यमिक विभाग), मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी (प्राथमिक विभाग) तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या खेळाडूंना विद्यालयाचे प्रशिक्षक ओम गाढवे सरांची मोलाची साथ आणि मार्गदर्शन मिळाले.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मोहम्मद सिराजने  फक्त ८ षटकांत ५ विकेट घेत विंडीज संघाची उडवली दाणादाण
पुढील बातमी
श्रीक्षेत्र धावडशी येथे अधिकमास निमित्त 362 सत्यनारायण महापूजा उत्साहात संपन्न.

संबंधित बातम्या