सातारा : एकास मारहाण करून लूटमार केल्याप्रकरणी 19 जणांविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. एक रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लिंब, ता. सातारा येथे सागर संजय मोरे मूळ रा. शिवरे दिगर, ता. पारोळा, जि. जळगाव. सध्या रा. लिंब, ता. सातारा या ऊसतोड कामगाराला मारहाण करून
एकूण 7 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या सात बैल जोड्या व सात बैलगाड्या ट्रक व दोन ट्रॉली मधून जबरदस्तीने घेऊन गेल्या प्रकरणी जगदीश रामधन राजपूत रा. वडगाव ता. कन्नड जि. संभाजीनगर, पांडुरंग सूर्यवंशी, सतीश खेडकर, शिवाजी माणिक रोमन आणि इतर 15 जण यांच्या विरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गुरव करीत आहेत.