सातारा : अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणारा मान्सून सातारा जिल्ह्यात दाखल झाला असून गुरूवारी रात्रीपासून पश्चिम भागात चांगला पाऊस पडला. कोयना, नवजासह महाबळेश्वरलाही हजेरी लावली. तसेच पूर्व भागातही अनेक ठिकाणी पाऊस पडला. तर हवामान विभागाने पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह जावळी, पाटण, महाबळेश्वर तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलाय.
जिल्ह्यात जून महिन्याच्या सुरुवातीला मान्सूनचा पाऊस दाखल होतो. पावसाला सुरूवात झाली की खरीप हंगाम पेरणीला सुरूवात होते. तसेच टंचाईची स्थितीही कमी होते. पण, गेल्या काही वर्षात मान्सूनचा पाऊस उशिरा येत असल्याचे दिसून आले. पण, यावर्षी मान्सूनचे देशात तसेच महाराष्ट्रातही वेळेवर आगमन झाले आहे. गुरूवारी तळकोकणात मान्सून आला. त्यानंतर सातारा जिल्ह्यातही आनंद सरी कोसळू लागल्या आहेत. गुरूवारी दुपारपासून जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस पडू लागला आहे. तर सातारा शहरात रात्री ११ नंतर पावसाला सुरूवात झाली. बराचवेळ पाऊस पडत होता. यामुळे रस्त्यावरुन पाण्याचे लोट वाहत होते. तर पूर्व भागातील माण, खटाव, फलटण या तालुक्यातील अनेक गावांत पावसाने हजेरी लावली. यामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येणार आहे.
जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पाटण, जावळी, महाबळेश्वर, वाई तालुक्यातही पाऊस पडला. यामुळे बळीराजांत आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. तर हवामान विभागाने जिल्ह्याला यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे १० जूनपर्यंत जोरदार पाऊस पडणार आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची तसेच घाट क्षेत्रातील महाबळेश्वर, जावळी, पाटण आणि वाई तालुक्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |